व्यक्तीमत्वे
सामाजिक व्यक्तिमत्वे–
- आबा पाटील–घोगावचे आबा पाटील हे प्रसिध्द बागायतदार व्यक्ती होते. कृष्णा नदी ही धान्याने अडवित असे, धन धान्य त्यांच्याकडे भरपूर होते. गोरगरिबांना मदत करीत होते दुष्काळकाळात जिल्हयात धान्य पुरवठा केला होता.
- कै. दत्तात्रय कृष्णा पाटील–हे गावातील कुस्त्या करणारे नामांकीत मल्ल होते. त्यांनी पुढाकार घेऊन गावात तालीम बांधली आहे.
-
श्री. अजित कुमार उफर् बाबासो लालासो पाटील–शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित तसेच शेती अभ्यासासाठी इजिप्त, इस्त्राईल, चिन इ. परदेश दौरे केले आहेत. महाराष्ट्रातील सर्व कृषि विद्यापीठे यांचा दौरा करुन शेतीत नवनवीन प्रयोग करुन उत्पादन वाढ केली व गावातील तरुणांना शेतीसाठी प्रोत्साहीत केले. गाव निर्मलग्राम करणेसाठी प्रयत्न केले.