ग्रामदैवते

–गावातील ग्रामदैवते व इतर धार्मिक कार्यक्रम–

हनुमान–गावाचे आराध्य दैवत

हनुमान–गावाचे आराध्य दैवत, गावात मध्यभागी पुर्वमुखी हनुमान मंदीर आहे. त्यासमोर भव्य सभा मंडप आहे. चैत्र पौर्णिमेस हनुमान जयंती दिवशी या देवाची मोठी जत्रा भरते हिंदु मुस्लीम, दलित सवर्ण एकत्रीत गुन्यागोविंदाने वावरतात.


 राजे भास्कर पिरसाहेब– गावाचे पुर्वेस दुधोंडी रस्त्यालगत राजे भास्कर पिर साहेब दर्गा आहे. सदर दर्गा हिंदु मुस्लीम व दलित सवर्ण ऎक्याचे प्रतीक असुन तेथे सर्व लोक गुन्या गोविंदाने येथे वावरतात. पिरसाहेब उरुस नव्याच्या पौर्णिमेस फेब्रुवारीमध्ये भरतो. सदर दर्गाची स्थापना 1914 साली झाली.


बिरोबा–गावाचे उत्तरेस दुधोंडी रस्त्यालगत पुर्वमुखी बिरोबादेवाचे मंदीर आहे. सदर देवालय धनगर समाजातील लोकांचे आराध्य दैवत आहे.


मारुती मंदीर.


विठ्ठल रखुमाई मंदीर.

ही सर्व मंदीरे कृष्णा नदीकाठी जुने घोगांव येथे आहेत.


गावात वैयक्तिक मंदीरे–विठ्ठल रुक्मिणी शंकर मंदीर बिरोबा मंदीरे वैयक्तिक मालकीची आहेत.

  • जुने घोगांव येथे औरंगजेबाने बांधलेली मसजीद आहे. हनुमान मंदीरामध्ये दोन वेळा पारायण भरविले जाते. त्यामध्ये हिंदु–मुस्लीम दलित सवर्ण सर्वजन सहभागी होतात.
  • आंबेडकर जयंती–दलित वस्तीत आंबेडकर जयंती उत्साहात साजरी केली जाते.