जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा–इयत्ता 1.ली ते 4.थी.
घोगांव हायस्कूल घोगांव–इ. 5.वी ते 10. वी.
घोगांव हे गाव कृष्णा नदीच्या तिरावर वसले होते. सन 1914 साली आलेल्या महापुरामुळे घोगांवचे जिवीत प्राणहानी व आर्थिक फार नुकसान झाले. त्यावेळी प्लेग पटकीची साथ उद्भवल्याने त्यानंतरशासनाने कृष्णा नदीपासुन 2 किमी. अंतरावर गावठानामध्ये मास्टर प्लॅननुसार प्लॉट पाडून नवीन घोगावची निर्मिती केली. पूर्वी गौतम ऋषींचे येणे वास्तव्य होते. तसेच सागरेश्वरास ऋषीमुनींना अभिषेक घालण्यासाठी दुध, दही येथून दिले जायचे त्यावरुन या गावामध्ये गायींची संख्या जास्त असलेमुळे या गावास गो गाव असे संबोधले जायचे त्याचे कालांतराने घोगांव असे नामकरण झाले. याचाउल्लेख सागरेश्वर महात्म या ग्रंथामध्ये देखील याचा उल्लेख आढळुन येतो. ‘‘औरंगजेबाने जुने घोगांव येथे एका रात्रीत मसजीद बांधकाम करुन घेतले आहे’